श्री गजानन महाराज अर्बन को-ऑप. बँक लि., भोकरदन, जिल्हा जालना या बँकेच्या स्थापनेसाठी संस्थापक चेअरमन श्री गणेशराव संतुकराव पाटील रोकडे यांनी १९९२ पासून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास सुरुवात केली.
नोंदणी क्रमांक जे.ए.एल./जे.ए.एल./बी.एन.के.(ओ) ११८/९५ दिनांक १६ मार्च १९९५ नुसार बँकेची रीतसर नोंदणी झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने भागभांडवल रुपये ६ लाख जमा करण्याचे कळविल्यानंतर मुख्य प्रवर्तक व सहकाऱ्यांनी अल्पावधीत आवश्यक भागभांडवल जमा केले.
भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग व्यवसायाचा परवाना क्रमांक UBD MAHARASHTRA 1170 P दिनांक १८ ऑक्टोबर १९९५ रोजी दिला. १० बाय २० फुटांच्या भाड्याच्या जागेत ६ जानेवारी १९९६ रोजी बँकेचे उद्घाटन झाले.
शाखा विस्तार
- राजूर शाखा: ९ मे २००४
- जाफ्राबाद शाखा: १२ जून २०१०
- वालसावंगी शाखा: १३ फेब्रुवारी २०१५
- माहोरा शाखा: २६ एप्रिल २०२४
१९९६ मध्ये लावलेले छोटेसे रोपटे आज पाच शाखांच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या भव्य संस्थेत रूपांतरित झाले आहे.